...

5 views

आईच ती
आईच ती

आई म्हणजे आई असते,
तुमची आमची सारखी असते,
पोटच्या गोळ्या साठी सतत झटते,
ती आईच असते .

आपली भूक पाण्यावर शमवते,
तोंडच्या घासाने बाळाचे पोट भरते,
घरची अन्नपुर्णा कधी उपाशीच राहते,
आईची अशीच माया असते .

आकाशी झेपावणारे पंख ती बळावते,
विश्वाच्या संसारातील धडे शिकवते ,
आत्मविश्वास जागवून पुढे रेटते,
भविष्याचे स्वप्न बघणारी आई ही असते.

गैरवर्तनाची शिक्षा करते,
कधी जुन्या चुका उकरुन अद्दल घडवते,
साखर झोपेतल्या लेकराकडे पाहून,
मग स्वतःच अश्रु ओघळते,
ममतेची तुडूंब घागर असते.

बेचैन मन तिचं केव्हातरी ते,
चेहरा शिताफीने लपवते भाव सारे,
आनंदात शामिल ती मग होते,
त्यागाची मूर्तीच असते.

कसे उपकार फेडू देवा तुझे,
सुखकर करण्यास जीवन आमचे,
तूझे रूप आई मधे लाभले,
सर्वांच्या इच्छा पुरणत्वास नेते,
जणू कल्पतरू ची देणगीच भासते.

......📝 गेयता कौस्तुभ जोशी
© All Rights Reserved