...

27 views

लॉकडाउन नंतरची शाळा
आज म्या किती, दिवसांनी शाळेत गेलो
लॉकडाउन नंतर, आज मोकळा झालो
वर्गात भेटले, माये सगळे दोस्त
पण गर्लफ्रेंड ले पाहून, झालो मी फस्त.........

गर्लफ्रेंड होती मायी, लयच भारी
पण आज दिसें, ते नाराज सारी
म्या म्हटलं, काय झालं व तुले
म्हणे मायी समोरचा बेंच, घेतला त्या पोट्टीणे......

म्या म्हटलं तु आज, नाराज नको होऊ
तुया समोरचा बेंच, म्या मिळवून देऊ
म्हणुन म्या केले, प्रयत्न अपार
पण यश नाही मिळाल, अन झालो लाचार.........

पण मग आली एक, आयडिया न कल्पना
वर्गात खोकलाले, लागलो तना तना
सगळ्यांले वाटल, आलाय कोरोना
वर्गातून पळाले, सगळे दना दना.........

मगच झाला, पूर्ण वर्ग खाली
मी न मायी गर्लफ्रेंड, होतो थोडे ताली
बसलो समोरच्या बेंचवर, आता राजा वाणी
वाटे मी जिंकलोय, युद्ध खोकल्यातुनी........

मी न मायी गर्लफ्रेंड, बसलो समोर
तिकडून आला मास्तर, अन थोडे पोर
आले सोबत घेऊन, दोन तीन डॉक्टर
म्हणले हाच तो पोट्टा, जो खोकलला भरा भर.......

आता मायी लेका, चांगलीच टरकली
थोडयाश्या खोकल्यान, आग चांगलीच भडकली
समोर होता डॉक्टर, अन थोडया पोरी
मी लगेच धावाले, लागलो तुर तुरी......

मी धावो समोर अन, डॉक्टर मागावर
तो आला जवळ त मी खोकललो खर खर
तो घाबरला अन पळाला सर सर
म्या म्हटल खोकला आहे शस्त्र मस्त सार.

© गुरु