...

10 views

छान वाटलं तुझं चिडणं...
फोन उचलला नाही म्हणून रागावलीस...

नाक मुरडून गाली दोन्ही फुगावलीस...

छान वाटल तुझं चिडणं...

समजतंय प्रेमात माझ्या तु ही हरवलीस...



मेसेज वर तुला मी मनवतोय...

तुझं खोटं रुसणं मनोमनी सुखावतंय...

आता प्रेमाच्या दोन गोष्टी पणं बोल...

तुझ्या दोन शब्दांसाठी प्रत्येक क्षण खुणावतंय...



ठीक आहे नको बोलुस...

मनातलं काही नको खोलूस...

मला पाहुन हलकेच हस...

नजरेला नजर देत मनात माझ्या बस...
© SURYAKANT_R.J.