...

7 views

MAKAR SANKRANTI
जी माणसे गोडच आहेत
त्यांना गरज काय तिळगुळाची?
माणसाला माणूसपण द्या
ही गरज आहे काळाची...

आपल्याशी न बोलणाऱ्यांना
आपण देतो का तिळगुळ?
का नष्ट करत नाही आपण
मनातून द्वेष मग समूळ...

भाऊ भावाचा वैरी ही
कित्येक घरात ख्याती
खरचं तिळगुळ देऊन
सुधारतील का नाती?

तिळगुळ घ्या गोड बोला
ऐकायला वाटतं हो बरं...
अंतर्मनातून एकदा सांगा
लोकं तसं वागतात का खरं...

तिळगुळ घेऊन जर खरचं
माणसं बोलतं असती गोड...
अजून घट्ट झाली असती ना
नात्यातील आपुलकी अन ओढ...

💐 *मकर संक्रांती शुभेच्छा* 💐

© ꧁༒☬𝓨𝓐𝓜𝓡𝓐𝓙 ☬༒꧂