23 views
तिच्या विरही डोळ्यात
तिच्या विरही डोळ्यात
रूजले होते असे काही
भंगलेल्या अधीर स्वप्नांना
पुरावं लागलं मातीत तिलाही...
अवीट गोड बहाणे तिचे
विचित्र वादळाची चाहूल
अचानक धडकले वाटेत
साऱ्या सुखांना केलं मातीमोल...
शांतता इतकी डोळ्यात
की पापणीचाही आवाज
गुदमरले अश्रू डोळ्यात
वावरतांना ती चढवी खोटा साज...
ओली होते संध्याकाळ
उदासी ही रंग माळते
रातीला नीज नाही आता
रात्र पहाटेला हिरमुसते...
शोभा मानवटकर....
रूजले होते असे काही
भंगलेल्या अधीर स्वप्नांना
पुरावं लागलं मातीत तिलाही...
अवीट गोड बहाणे तिचे
विचित्र वादळाची चाहूल
अचानक धडकले वाटेत
साऱ्या सुखांना केलं मातीमोल...
शांतता इतकी डोळ्यात
की पापणीचाही आवाज
गुदमरले अश्रू डोळ्यात
वावरतांना ती चढवी खोटा साज...
ओली होते संध्याकाळ
उदासी ही रंग माळते
रातीला नीज नाही आता
रात्र पहाटेला हिरमुसते...
शोभा मानवटकर....
Related Stories
21 Likes
10
Comments
21 Likes
10
Comments