...

6 views

पुण्य जन्माचे सारे.......
निर्गुण निराकार ब्रह्म
सगुण साकार जाहला.....|
पंढरीचा राणा,
मजला भेटायाला आला......||

काय करू अन काय नको,
तेची कळेनासे झाले.....|
ऐसे विलक्षण रूप,
जेव्हा नजरेला आले....||

मग परी त्याच्या साठी,
गोड पुरणपोळी केली....|
त्याच्या एका घासा परी जगाची,
क्षुधा तृप्त झाली......||

भक्ती रंगी पूरी आज,
मी बावळीच झाली....|
जागोजागी भगवत मुर्ती,
याची डोळा देखीली.....||

पुण्य जन्माचे सारे एका
क्षणात गवसून आले....|
आज ज्ञानेश्वरी चे हे
भाग्य उजळून आले......||
© PradnyaBhide