...

18 views

कविता
मनाला विचारले मी सहजच
​थांबव ना रे हे जीवघेणी तळमळ तुझी
​जरा विसावा घेऊ दे एकांतात
​मन बोलले
​मी काय तुझी सावली आहे का
​तू जिथे जाशील तिथे येईल
​आणि जिथे थांबशील तिथे विसावेल
​खूप ठाम बोलला तो
​मी मन आहे कुठेच थांबत नाही
​माझा प्रवास हा निरंतर सुरू असतो
​शेवटच्या श्वासानंतरही अविरत...

​ शोभा मानवटकर...
© All Rights Reserved