...

22 views

आभार....💐💐💐
आदरणीय माई, जीवाभावाचे मित्र वंश(सँडी) सर
​जिज्ञासा Madam, पूनम,मधू,अनामिका, आशा मन एक लेखणी परिवारातील सगळे वाचक,फॉलोअर्स आणि माझे प्रिय मित्र मैत्रीणी
​आज माझ्या वाढदिवसानिमित्त तुम्ही सगळ्यांनी माझ्यावर जो शूभेच्छांचा वर्षाव केलाय...इतकं भरभरून प्रेम दिलंत आपुलकी, जिव्हाळा त्याने मी इतकी भारावून गेले की...कुठल्या शब्दाने मी आपल्या सगळ्यांचे आभार मानू नाही कळत... खरंतर आभार मानून मी आपल्या सगळ्यांचा अपमान करत आहे हा गैरसमज करून घेऊ नका...खरं पाहिलं तर मी आपलं मन मोकळं करत आहे तुमच्या सारख्या मित्र मैत्रीणीजवळ अगदी हक्काने बरं का...ते करण्यापासून मला नाही ना कोणी अडवू शकत..
​ खरंतर आपण या आभासी दुनियेत एकमेकांशी कसे योगायोगाने जुळलोत...जुळलो काय तर मैत्रीसारख्या पवित्र बंधनात कसे अगदी घट्ट बांधल्या गेलोत नाही का...पण खरंच हि मैत्रीची नाळ दिवसेंदिवस आणखी घट्ट होत जावी असंच वाटते मला आणि आपल्या सगळ्यांना सुद्धा असंच वाटते ना...मला माहिती आहे सगळ्यांची उत्तरं हो च असणार आहेत आणि हे मी गृहीत नाही धरलं तर ठाम अगदी विश्वासाने म्हणते...
​ खरंच मी इतकी आनंदी आहे की शब्दं तोकडे पडलेत तुमचं प्रेम इतकं ओसंडून वाहत आहे आणि माझी झोळी आज कमी पडतेय तुम्हा सगळ्यांच्या प्रेमाला कुठे आणि कशी साठवून ठेवू
​कळत नाही मला...किती भाग्यवान आहे मी की तुमच्या सारखे मित्र मैत्रीणी माझ्या अवतीभवती आहेत खरंच...आणि वंश सर यु आर जिनियस किती आपुलकी, प्रेम,जिव्हाळा आहे तुमच्यात सर्वांसाठी अहंकार,गर्वाचा तीळमात्र लवलेशही नाही खरंच तुमच्या विषयी मी काय लिहू शब्द अपुरी पडतील मी स्वतः शब्दसागरात राहते पण ते शब्दंही तुमच्या करीता कमीच आहे खूप खूप खूप आनंदी आहे मी.. इतका वेळ बोललोत आपण पण अगदी आपल्याच जिवश्चं कंठश्च माणसासोबत बोललोत असंच वाटलं....आज एक वाक्य मला आवर्जून तुमच्या साठी लिहावसं वाटते
​मी सुद्धा याच वाक्याच्या विचारधारेने प्रभावित आहे आणि रोजच्या आयुष्यात ही मी तशीच वागते पण ते तुमच्या करीता अगदी तंतोतंत जुळते
"​मूर्ती लहान पण किर्ती महान" असंच आहात तुम्ही..खरंतर खूप लिहावंसं वाटते पण नाही लिहू कदाचित मलाच गर्व होईल माझ्या लिहिण्याचा आणि ते योग्य नाही. तुम्ही सुद्धा शब्दांचे जादूगार आहात तेव्हा शब्दातील भावना नक्कीच कळतील तुम्हाला..
​ तुम्ही दिलेल्या वाढदिवसाच्या शूभेच्छा ह्या माझ्यासाठी अगदी गॉडगिफ्ट आहे आणि तुम्ही बोललेत ते क्षण अविस्मरणीय असे आहेत कधीच विसरू शकणार नाही आणि खरंच खूप सांभाळून जपून ठेवेल..धन्यवाद नाही म्हणणार मी मैत्रीमध्ये नो सॉरी, नो थँक्यू आणि एक आपण सर्व आपल्या
​ग्रुपमधले खूप छान आहोत आणि कायम असेच राहू अशीच मी ईश्वरचरणी मागणं मागते अगदी एका मालेमध्ये गुंफलेले मोत्यांसारखे..
​ .... 🙏🙏 ....
© All Rights Reserved