...

2 views

कळतं पण वळत नाही
सारं सारं कळतयं
पण वळतय कुठं
झाड तोडली
नुसकान स्वतःचीच

पाण्याची नासधुस केली
नुसकान स्वतःचीच

गाड्यांचा धुर आकाशात,
ओझन वायु कमी
नुसकान स्वतःचीच

कारखान्यांचा सांडपाणि नदित
वेगवेगळे आजार
नुसकान स्वतःचीच

रासायनिक पदार्थ बनवतोय
वेगवेगळ्या रोगाने त्रस्त
नुसकान स्वतःचीच

या साऱ्याला जबाबदार स्वतःच
तरी नुसकान स्वतःचीच हे माहित असून
कळतं पण वळत नाही