...

4 views

सुशिक्षीत आजची पिढी
सुशिक्षीत आजची पिढी नावा रूपाने बहरतेय
शिक्षण घेऊन हे पोर माणुसकी विसरतय
हाल अपेष्ठा सहन करून पोराला शिकवलय केलेल्या प्रयत्नांना यानी जवळून कधी पाहिलय
म्हातारपणीचा आधार हा वेगळाच तोरा मिरवतोय
बापाच्याच जिव्हारी हा घाव आता करतय पिकल पान कधी गळल हे कुणा कळतय गरज आहे तेव्हा तो नेमकी पाठ फिरवतय आशा आकांक्षांना तो पैशाने तोलतय
एक नजर पहायला बाप इथ झूरतय
पण वेळ काढून त्याला येण कधी जमलय
जन्म दिल्याल पोर आपल्याला टाळतय सांगा शिकून तरी यान जाण कोणती ठेवलय
सुशिक्षीत बनवुन आम्ही काय पाप केलय
घडवल म्हणुन सोन पण हे तर लोखंड निघालय ...
© k. rajshekhar