...

1 views

झाड
काट्यालाही इजा होतात खोडताना
मुळापासून आपलं देठ तोडताना

सहज नाही झालं बीजांकुर त्या झाडाचं
सोसल्या कैक कळा काळीज कापताना

पांदीच्या कढीला गुदमरला श्वास गाव मोकळा होताना
त्या डबड्यातील पाणीच आलं कामाला झाड वाढताना

चंदी झाली झाडाची त्या माणसं फुलं वेचताना
टोचू लागली काटे बाभळीला फुलं असताना

उन्हाळे पावसाळे सहन केले रानात उभे राहताना
अंधार पांघरूण घ्यावा लागतो चंद्राला शोभताना

कंठ दाटला झाडाला काटेच काट्याशी भांडताना
चर चर काळीज फाटू लागलं झाडाखालची माणसे वाचताना

गरजेनुसार आवडीनुसार प्रत्येकाने वार केले
हवा तेवढाच भाग नेला उभे झाड कापताना

भुंडया ख्वाडाला पुन्हा पालवी फुटली हिरवळ बहरताना
फाटलेलं आभाळ ठेंगणं झालंय द्वेषाला प्रेमाने सिंचताना