...

3 views

रम्य ते बालपण
रम्य ते बालपण
चिऊ माऊची ती साठवन
घास भरवला रूसूबाई
तेव्हा हसू आल खूदकून..
ओठांवरचे शब्द हे बोबडे
त्यात आई बाबांचे नामस्मरण
देता हात चालायला पुढे
अंगाई गीत गाई माय लेकरान..
काय सांगु ती नवलाई
ज्यात माझ्या जिवाचे संगोपन
घडविणारा गोड तो बाप
माझ्या जिवनाचा ते स्वाभिमान...
© k. rajshekhar