...

0 views

सरण
जळाला तो केंव्हाचा
आता सरण जळतं आहे
सोंग कशाला आसवांचे
हे त्याला कळून चुकले आहे

होते नव्हते ते उसने पासने
नाते आता तू जोडते आहे
ढनाढना लागली आग त्याला
हार त्याचा एकांत आहे

होईल आता राख त्याची
जे गंगेने धुतले आहे
गाडी त्याची हूकली होती
तुझं सारं चाक चूकलं आहे

आस होती सावलीची
तू उन्हात त्याला आणलं आहे
बसला होता झाडाखाली
त्याचं झाड त्यालाच उतलं आहे

ज्याने त्याने केले वार
लागला तुला मटका आहे
दिवसाढवळ्या झटका दिला
केली त्याने सुटका आहे

भेटण्याआधी होती त्याची रकरक
आता भकभक त्याने जाणली आहे
तू कशाला काळजी करती
त्याने आधीच त्याची गार खणली आहे