...

14 views

वाटणी एक उत्तम निर्णय
वाटणी एक उत्तम निर्णय

वडील - बापुराव
मोठा मुलगा -राकेश
मधला मुलगा -सुरेश
धाकटा मुलगा - मुकेश

राकेश-
"बाबा ! पंचमंडळी जमली आहे, आता वाटणी करा".

सरपंच- "जर एकत्र राहणं जमत नसेल तर मुलांना वाटून दिलेलं बरे .
आता हे सांगा की तुम्ही कोणत्या मुला बरोबर रहाणार? " (सरपंच बापुरावांना विचारले)

राकेश- "हे काय विचारणं झालं, चार महीने बाबा माझ्या कडे रहातील, चार महीने मधल्या कडे आणि चार महीने धाकट्या कडे रहातील.

सरपंच- "चला तर मग निर्णय पक्का झाला, आता संपतीची वाटणी करुया".

बापुराव- (एवढा वेश आकाशा कडे डोळे लावून बसला होता अचानक ओरडला)
कसला वाटणी?
वाटणी मी करणार, या तिघांनी अंगावरच्या कपड्यांवर माझ्या घरातून बाहेर निघावे" "चार महीने आळी-पाळीने माझ्या घरी रहायला यावं आणि बाकीच्या महीण्यांची व्यवस्था ज्याची त्याने करावी..."
"संपतीचा मालक मी आहे"
तीनही मुलं आणि पंचमंडळीचा आवाज बंद झाला, बापुरावांनी वाटणीची नविनच शक्कल लढवून सगळ्या वयस्कर मंडळींचे डोळे उघळले .
याला म्हणतात निर्णय,
वाटणी पोरांनी नाही आई-बापांनी वाटणी करायची .