...

2 views

लग्नानंतर कुठे जातात या टॉपर मुली...?
लग्नानंतर कुठे जातात या टॉपर मुली..?
सगळ्याच गोष्टीत मूल पुढे आहेत.
मग ८० ते ९९% मार्क घेऊन *मुली जातात तरी कुठे..?
मुली दहावीत टॉप..
बारावीत टॉप..
Engineering, Doctors , MBBS, LLB, MBA, CA, CS, तसेच उत्कृष्ट खेळाडू असे करीअर करुनच
सगळ्या गोष्टीत मुली टॉप.
मग बहुतांश तज्ज्ञ आणि हुशार लोकांनाच प्रश्न असतो
कुठे जातात या टॉपर मुली..?
आज उत्तर देतो
त्या इकडेच असतात तुमच्या आजूबाजूला पण दिसत नाही कारण
त्या नाती सांभाळत असतात,
कोणी हातात बाळ घेऊन जगण्याशी लढत असतात,
कोणी नवऱ्याचे डबे बनवत असतात आणि कोणी कौटुंबिक हिंसाचाराच्या बळी सुद्धा होत असतात....
मुलींचं शिक्षण आपल्या आई वडिलांकडे असतात तोवर सुरळीत होत असते,
घरात कसलीही जबाबदारी नाही मुलीचे आई वडील आपल्या मुलीच्या करिअर संबंधी खूप विचार करतात, पैसा ओततात पण..
मग २५ वय होताच अचानक लग्न होतं आणि
तिकडून टॉपर मुली गायब होण्यास सुरवात होते...
काल क्लासेस वरून निघत असताना कित्येक वर्षाने एक मैत्रीण भेटली १ वर्षाच्या मुला सोबत तिला पाहून मी आश्चर्यचकित झालो..
इकडच्या-तिकडच्या गोष्टी करून तिने विचारलं
तुझ्या क्लास मध्ये एखादा विषय आहे का शिकवायला, मी घेत जाईल क्लास, कमी पगार असला तरी चालेल"
हे ऐकून विचारात पडलो
अत्यंत हुशार, शाळेत कायम पहिली, कधी कुणाशी वैर नाही की कोणत्या मुलाशी भानगड नाही...
आई वडिलांनी भरपूर पैसे खर्च करून शिकवलं, मोठे क्लासेस, चांगले कॉलेज मधून शिक्षण ही भविष्यात काहीतरी करणार अशी सगळ्यांची आशा... असलेल्या मुलीची अशी अवस्था पाहून धक्काच बसला.
खूप विचारपूस केल्यावर समजलं तिच्या आई वडिलांनी खूप पैसा असलेल्या मुलाशी लग्न लावून दिलं,
लग्न नंतर शिकू देऊ, नोकरी करू देऊ सांगून लग्न लावून दिलं..
पण घरात बायकोला थोडेफार पैसे देऊन सगळा हिशोब मागायचा...
शिक्षण-नोकरी तर लांब राहिली स्वयंपाक आणि घरातली कामं यावरून तिची पारख होण्यास सुरुवात झाली..
कारण लग्नानंतर सासरच्या लोकांसाठी टॉपर, हुशार, शिक्षण या सर्व गोष्टीं शून्य असतात
पण स्वयंपाक येत नसेल तर काय उपयोग एवढं शिकून..? साधा स्वयंपाक येत नाही .
असा प्रश्न करतात
मग तिने कसतरी घरचं काम शिकून नोकरी करण्यास सुरुवात केली .
पण नंतर
मुल होण्यासाठी घाई केली आणि त्यात पूर्ण अडकवून दिलं, घरात रोजचे पाहुणे, त्यांचं आगत स्वागत, बाळाचा सांभाळ या सगळ्या चक्रव्यूहात अडकून गेली होती ती बाजूला राहील ते तीच शिक्षण आणि हुशारी.
कागदाचे तुकडे बनून राहिल्या होत्या तिच्या सर्व डिग्र्या .

नंतर मनात विचार आला कोणी पोटातून तर शिकून येत नाही आणि कालपर्यंत शिक्षण आणि करिअर मध्ये गुंतलेल्या मुलींना सगळं शिकायला आणि नीट जमायला थोडा वेळ तर लागेल हे का कोणी समजून घेतं नाही..??

याउलट जर फक्त घर आणि परिवार सांभाळण्यासाठी मुलगी हवी असेल तर..
एखादी दहावी नापास पण स्वयंपाक उत्तम येत असेल अश्या मुलीशी लग्न का नाही करत..??
चार लोकांमध्ये अपमान होऊ नये म्हणून शिकलेल्या मुलीशी लग्न करायचं आणि मग भाजीत तेल जास्त, मीठ कमी, मसाला कमी, पोळ्या कडक किंवा भाजी पातळ यावरून तिच्या शिक्षणाचं आकलन का करायचं..??

कधी कधी विचार येतो
लता मंगेशकर खरंच यांनी लग्न केलं नाही कदाचित म्हणून त्यांचा कर्तुत्वाला थांबवू शकलं नाही कोणी..?
की मेरी कोम च्या नवऱ्याने घरातली अगदी स्वयंपाकपासून ते बाळ सांभाळण्याची जबाबदारी उचलली म्हणून ती जिंकत गेली..??

पण आता सगळं लक्षात आल की कुठे जातात या टॉपर मुली...
असतात या आपल्याच आजूबाजूला, डोक्यावर पदर घेऊन सासुसोबत पूजेला जात असतात तर कोणी नवऱ्याचा मित्रांना चहा नाश्ता बनवत असतात... कधी त्या आपल्यातच असतात

ह्या टॉपर मुलीं अजून टॉप वर जाऊ शकतात फक्त हवेत उडण्या आधी त्यांचे पंख छाटू नका..!!


🙏🌹धन्यवाद🌹🙏